कृषी कायद्यांविरोधात असलेले आंदोलक प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली करणार असे समजल्याने दिल्ली पोलिसांनी ह्या रॅली वर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. ह्याविषयी आमची बातमी वाचा
ह्या अर्जावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आपण ह्यात हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्ट केले.
दिल्लीत कोणाला येऊ द्यायचे आणि कोणाला नाही हा सर्वस्वी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ह्या विषयात कायद्यानी दिलेल्या सर्व शक्तीचा वापर करण्याची मुभा दिली पोलिसांना आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
ह्यावेळी दिल्ली पोलिसांनी कोर्टाने बंदीची ऑर्डर करावी असा आग्रह धरला. पण पोलिसांना मुळातच ह्याविषयात कारवाई करण्याचे अधिकार असल्याने आमच्या ऑर्डर ची गरज नाही अशी भूमिका कोर्टाने घेतली.
कृषी कायद्यांवर १२ तारखेला सुनावणी झाली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्टे दिला होता आणि एका समितीची स्थापना केली होती. पण ही समिती कोलमडली असल्याने ( ह्याविषयी आमचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा ) ह्यात आता कोर्ट आज काय करते ह्याची उत्सुकता होती. परंतु आज सरन्यायाधीशांबरोबर इतर दोन वेगळे न्यायमूर्ती होते त्यामुळे आज सुनावणी न घेता २० तारखेला ह्यावर सुनावणी होणार आहे.
ट्रॅक्टर रॅली थांबवण्याची जबाबदारी ढकलून कोर्टाने पोलिसांवर टाकली आहे त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतात हा प्रश्न सर्वांना पडला आहे.