हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तांडव (Tandav) या वेबसिरीजच्या निमित्ताने अमेझॉन प्राईमला (Amazon Prime) केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ( I&B Ministry) ने हजर राहण्याची सूचना दिली आहे. रविवारी ही माहिती मीडियाला देण्यात आली.
तांडव ही वेबसिरीज हिंदू भावनांचा अनादर करणारी आहे, असे म्हटले गेले. 15 जानेवारीला सिरीज रिलीज करण्यात आली. अनेकांनी सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी देखील तांडव वेबसिरीज विरोधात तक्रार दिली होती.