“टीआरपी प्रकरणातील आरोपीचा छळ; जे. जे. रुग्णालयात मृत्यूशय्येवर”

पोलिसांविरोधात कुटुंबियांची उच्च न्यायालयात धाव 

कथित टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा पोलिसांनी अनन्वित छळ केला असून जेजे रुग्णालयात ते मृत्यूशय्येवर आहेत, असा दावा दासगुप्ता यांच्या मुलीने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही माहिती दिली. तसेच दासगुप्ता यांचे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती वृत्तसंस्थानी दिली आहे. 

@LawMarathi #LegalNewsMarathi

रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसांनी टीआरपी प्रकरणात मोहीम उघडली होती. 

 

रिपब्लिक टीव्ही व बीएआरसी यांच्यावर टीआरपी घोटाळ्याचे आरोप मुंबई पोलिसांनी ठेवले होते. त्या प्रकरणी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक झाली. 

   

दासगुप्ता तळोजा कारागृहात होते. १५ जानेवारी रोजी दासगुप्ता यांना जे.जे. इस्पितळात हलविण्यात आले. पोलिसांनी कुटुंबियांना १६ तारखेला मध्यरात्री याविषयी माहिती दिली, असे दासगुप्ता कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांच्या मुलीने त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांचा अनन्वित छळ झाला असल्याचे, मुलीने म्हटले आहे. 

 

दासगुप्ता कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 

 

One thought on ““टीआरपी प्रकरणातील आरोपीचा छळ; जे. जे. रुग्णालयात मृत्यूशय्येवर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!