स्टेजवर सरस्वतीची मूर्ती राज्यघटनेला मान्य आहे का?
     

विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार एका लेखकाने नाकारला. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार स्टेजवर सरस्वतीची मूर्ती होती, म्हणून त्यांनी पुरस्कार घेतला नाही. सरस्वतीच्या ऐवजी अन्य कोण्यातरी समाजसुधारकांची मूर्ती ठेवावी , असंही संबंधित लेखक-साहित्यिकाचे म्हणणे होते. परंतु आपला देश ज्या संविधानाच्या आधारे चालतो, त्यात याविषयी काय लिहिले आहे, हे आपण समजून घेऊया. सरस्वतीची मूर्ती स्टेजवर ठेवणे संविधानाला मान्य आहे का, पाहूया थोडक्यात.

  @LawMarathi  

भारताचे संविधानातील धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मीपणा नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या रूढी-परंपरा-धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे.

 

परंतुु, आपले धर्मस्वातंत्र्य कसेही वापरण्याचा अधिकार नागरिकांना नाही. सार्वजनिक आरोग्य, सुव्यवस्था तसेच इतरांचे मूलभूत अधिकार या तीन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. या तीन बाबींच्या विरोधात जाऊन कोणालाही धर्मस्वातंत्र्य दिले गेलेले नाही.

  #LawMarathi.com  

विदर्भ साहित्य संघ, ही एक संस्था आहे. तसेच या संस्थेच्या कार्यक्रमात मूर्ती/प्रतिमा कोणती असावी, हे ठरविण्याचा अधिकार आयोजकांना होता. आयोजकांनी त्या अधिकाराचा उपयोग संविधान व कायद्याला धरून केला होता.

 

सरस्वतीचीी मूर्ती ठेवण्याचा संपूर्ण अधिकार विदर्भ साहित्य मंडळाला आहे. तसेच आपले श्रद्धास्थान कोणतं असावं, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामध्ये सरस्वतीची प्रतिमा असावी की अन्य कोणाची, याचाही अधिकार संबंधित नागरिकाला देण्यात आला आहे.

  @LawMarathi #LegalNewsMarathi  

तसेच अनेक खटल्यात हिंदू धर्माविषयी निर्णय झाले आहे. त्यात हिंदुत्व म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धत आहे, असेही म्हटले गेले आहे. सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती, हे एका धर्माचे पुरस्कार करणारे प्रतीक नाही. सांस्कृतिक परंपरेत सरस्वतीच्या प्रतिमेला स्थान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!