निधी रझदानसारखं तुमच्यासोबतही झालं तर कायदेशीर उपाय कोणते?
   

एनडीटीव्हीच्या पत्रकार निधी रझदान दोन दिवस चर्चेत आहे. नुकतेच निधी यांची फसवणूक झाली. त्यामुळे त्या सोशल मीडियावर विनोदाचा विषय झाल्या आहेत. एका इमेल आयडी वरून निधी यांना मेल आला. "तुमची निवड हार्वर्ड विद्यापिठात प्राध्यापकपदी शिकवण्यासाठी झाली आहे, असं मेलद्वारे निधी यांना कळविण्यात आले. निधी यांनी पैसे पाठवले व नंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एरव्ही नरेंद्र मोदिंपासून भारतातील सर्वसामान्य माणसाला काही-न-काही उपदेश देणाऱ्या पत्रकारबाईंचा इतका भयंकर पचका झाला, म्हणून हा विषय चर्चेत आहे. निधी ह्यांनी ह्या ट्विट द्वारे आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली

 

असे काही आपल्यासोबत घडले तर कायदेशीर मार्ग कोणते आहेत, हे समजून घेऊया थोडक्यात.

 

इंटरनेटवर कशी कारवाई केली जाणार?

 

तर ICANN च्या डेटाबेस मधून संबंधित वेबसाईट , डोमेन कोणत्या देशात विकत घेतले गेले आहे, याची माहिती आपण घेऊ शकतो. तिथे सर्व वेबसाईट, डोमेनची डिरेक्टरी असते. त्या देशाला देखील आपण आपली तक्रार दिली पाहिजे. तसेच संबंधित वेबसाईटची तक्रार ICANN कडे केली पाहिजे.

 

@LawMarathi #LegalNews #Marathi

 

कलम ४२०: चारसो बिस हा शब्द तोतयागिरीसाठी वापरला जातो. इंडियन पिनल कोडतील कलम ४२० हे चिटिंग म्हणजेच फसवणुकीच्या गुन्ह्याविषयी आहे. त्याखाली तक्रार दाखल केली जाऊ शकते. तसेच कलम 416 खाली तक्रार दाखल होऊ शकते. बनावट ओळख सांगणे, हा 416 नुसार गुन्हा आहे.

 

आर्थिकगुन्हे शाखेकडे तक्रार: प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारा पोलिसांचा स्वतंत्र विभाग असतो. त्याकडे याविषयी तक्रार दिली जाऊ शकते.

 
अस होऊ नये, म्हणून काय काळजी घ्याल?
 

संबंधित वेबसाईट, डोमेनला सर्व प्रकारची सर्टिफिकेटस आहेत का, याचा तपास करा. नावाची व्यवस्थित खात्री करा. एखाद्या संस्था, कंपनीकडून इमेल त्यांच्या अधिकृत इमेल आयडी वरून पाठविण्यात येतो. त्यांच्या मेलआयडीवर त्यांच्या स्वतंत्र डोमेनचा उल्लेख असतो.

निधी रझदानसारखी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका?

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!