National investigation Agency कडून ' सीख्स फॉर जस्टिस ' ह्या खलिस्तानी अतिरेकी संघटनेशी संबंधित ४० व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.
ही खलिस्तानी अतिरेकी संघटना अमेरिकेत स्थित असून तिच्यावर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
कृषी कायदेविरोधी आंदोलनात ह्या संघटनेने घुसखोरी केल्याची माहिती केंद्र सरकारने नुकतीच सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. ह्या संघटनेने कृषी कायदेविरोधी आंदोलनात भाग घेणाऱ्याला १०,००० रुपये देऊ अशी पोस्टर्स लावल्याची माहितीही सरकारने दिली होती.
ह्या संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या इंडिया गेट ला खलिस्तान चा झेंडा फडकावणार्या व्यक्तीला १.८ कोटी रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले आहे असेही समजते.

NIA ने ह्या भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ४० व्यक्तींना चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. ह्यात कृषी कायदे विरोधी आंदोलनात सहभागी नेत्यांचीही नावे आहेत.