कोरोना लसींची माहिती जाहीर करा – उच्च न्यायालयात याचिका
 

मोदी सरकार विरोधी भूमिका घेण्यासाठी सोशल मीडिया वर प्रसिद्ध असलेल्या साकेत गोखले ह्यांनी covid-19 वर भारतात दिल्या जात असलेल्या लसींची माहिती जाहीर करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

 

आपण याचिका दाखल केल्याचे गोखले ह्यांनी आपल्या ट्विटर वरून एका ट्विरद्वारे सांगितले. ते ट्विट बघण्यासाठी क्लिक करा

 

भारतात आज कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीला प्रारंभ झाला. भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ची Covishield ही लस आणि भारत बायोटेक ची Covaxin ही लस अशा दोन्ही लसींना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ह्या औषधांना मान्यता देणाऱ्या केंद्र सरकारच्या मुख्य संस्थेकडून मान्यता देण्यात आली आहे.

 

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या लसींच्या सुरक्षितता आणि कार्यक्षमतेविषयी संपूर्ण माहिती सरकारने जाहीर केलेली नाही. याचिकाकर्त्यांनी ह्यापूर्वी माहिती अधिकारात DCGI कडून अशा माहितीची मागणी केली होती. पण तिथूनही त्यांना माहिती देण्यात आली नाही.

 

माहितीचा अधिकार भारतीय संविधानानुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनमरणाशी संबंधित असलेल्या ह्या विषयात सरकारने सर्व माहिती जाहीर केली पाहिजे असे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे.  नागरिकांना आपल्याला ह्या दोन्हीपैकी कुठली लस दिली जावी हे निवडण्याचा हक्क देण्यात आलेला नाही. तसेच Covaxin ज्यांना दिली जाईल त्यांना एक सहमती अर्ज ( consent form) भरावा लागणार आहे. ह्या लसींना तिसरी क्लिनिकल चाचणी पूर्ण होण्याआधीच emergency approval देण्यात आले आहे. अशावेळी नागरिकांना लसीविषयी माहिती असणे आवश्यक आहे असेही गोखले ह्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक ह्यांनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडे आपापल्या लसीबद्दल दिलेली माहिती सरकारने नागरिकांसाठी जाहीर करावी अशी मागणी ह्या याचिकेत करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!