धनंजय मुंडेंवर कोणकोणत्या कायद्यांखाली होऊ शकते कारवाई ?
   

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंडे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मुंडेंवर झालेले आरोप व त्यातील फॅक्टस् ची पडताळणी झालेली नाही. परंतु तरीही मुंडेंवर झालेल्या आरोपांविषयी कायदा काय म्हणतो ते थोडक्यात समजून घेऊया.

  Dhananjay Munde allegations of rape, bigamy, election fraud        

बलात्काराचा आरोप : धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत. जर आरोप सिद्ध झाले तर बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला कमीतकमी दहा वर्षे कैद किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

   

याशिवाय धनंजय मुंडेंवर अजून कोणकोणत्या कारवाया होऊ शकतात, याची आपण माहिती घेऊया.

   

प्रतिज्ञापत्र : धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा प्रकरण चर्चेत आल्यावर एका फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला होता. त्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याला शर्मा यांच्यासोबतच्या संबंधातून दोन अपत्य असून आपण त्यांना स्वतःचे नावदेखील दिल्याचे म्हटले होते. लोकप्रतिनिधीत्वाचा कायदा, 1951 मधील कलम 125A नुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणूकीचा फॉर्म भरताना खरी माहिती देणारे प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचे असते.  जर प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असेल तर सहा महिन्यांपर्यंत कैद इतकी शिक्षा आहे. भाजपने याविरोधात तक्रार दिली आहे.

Dhananjay Munde with Karuna Sharma and children    

द्विभार्या ( Bigamy) : करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंसोबत विवाह झाल्याचा दावा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. करुणा शर्मा या नावाचे फेसबुक प्रोफाइल बदलून त्याचे नाव करुणा धनंजय मुंडे करण्याआले होते. एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे IPC 494 नुसार गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास अशा प्रकरणातील गुन्हेगारालाला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

   

दोनपेक्षा जास्त अपत्य: दोनपेक्षा जास्त अपत्यांना (मुलं-मुलींना) जन्म दिलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास मनाई आहे. धनंजय मुंडे यांना एकूण किती अपत्य आहेत, हे समोर आल्यावर , त्याविषयी पडताळणी झाल्यावर त्याबाबत कारवाई केली जाऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!