धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हा दाखल करा – हाय कोर्टात याचिका
 

निवडणूक आयोगाला आपल्या मुलांच्या संख्येविषयी खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी जनहित याचिका हाय कोर्टात दाखल झाली आहे.

 

एका महिलेने बलात्काराची तक्रार केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चर्चेत आले होते. हे आरोप फेटाळताना त्यांनी आपले तक्रारदार महिलेच्या बहिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे जाहीर केले होते. सदर संबंधातून आपल्याला दोन मूले आहेत व आपण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेत असल्याचे मुंडे ह्यांनी कबूल केले होते. त्यांच्या ह्या कबुलने राज्यात खळबळ माजली होती.

मुंडे ह्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यात आपल्याला पत्नी जयश्री यांच्यापासून २ मुली असल्याची माहिती दिली होती मात्र आपल्या विवाहबाह्य संबंधातून असलेल्या आणखी २ अपत्यांची माहिती मुंडेंनी लपवून ठेवली. मुंडेंनी आपल्या उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरुद्ध IPC चे कलम ४२० आणि लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम १२५ अ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
 

पुण्यातील भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील ह्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते.

 

याचिकेवर सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. हाय कोर्टाकडून FIR नोंदवण्याचे आदेश पोलिसांना मिळाले तर मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात.

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!