नवाब मलिक ह्यांच्या जावयाला एनसबी कडून अटक, घरावर रेड
Nawab Malik's son-in-law arrested by NCB

काल (१३ जानेवारी) NCB ने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी चे नेते नवाब मलिक ह्यांच्या जावयाला अटक केली आणि त्याच्या वांद्रे येथील घरावर आज सकाळी धाड टाकली.

मलिक ह्यांचा जावई समीर खान ह्याचा अवैध ड्रग्ज व्यापारात हात असल्याच्या संशयावरून काल त्याला नर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो कडून समन्स बजावण्यात आले होते. काल १० तास चौकशी केल्यानंतर NCB कडून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक पुराव्यांच्या शोधासाठी आज सकाळी सहा वाजता खान ह्याच्या वांद्रे येथील घराची NCB कडून झडती घेण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मुंबईत वांद्रे व चेंबूर भागातून २०० किलो गांजा जप्त झाला होता. त्यानंतर झालेल्या कारवाईत करण सजनानी ह्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी करणाऱ्या व्यक्तीला NCB ने ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक ह्यांच्या जावयाचे नाव समोर आले. सजनानी आणि समीर खान ह्यांच्यातील अनेक आर्थिक व्यवहारांचे पुरावेही NCB कडे असल्याचे समजते.

समीर खान ह्याला कोर्टासमोर सदर करून पुढील चौकशीसाठी NCB कडून त्याची कस्टडी मागण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.

अमली पदार्थांच्या वापर, तस्करी संबंधी सर्व कारवाई चे अधिकार NCB ह्या केंद्रीय संस्थेकडे आहेत. सुशांत सिंह राजपूत च्या संशयास्पद मृत्यूनंतर NCB कडून मुंबईत चौकशी आणि अटक सत्र चालूच आहे. त्यात आणखी कोणत्या बड्या हस्तींची नावे समोर येतात हे बघणे उत्सुकतेचे असेल.

जावयाच्या अटकेविषयी प्रतिक्रिया देताना नवाब मलिक ह्यांनी हे ट्विट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!