ध्वनी प्रदुषण नियमांचा भंग करून धार्मिक स्थळी भोंगे लवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आणि प्रदूषण नियंत्रक मंडळाला द्या असे कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले.
गिरीश भारद्वाज ह्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि सचिन मगदूम ह्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ह्याविषयी अधिक स्पष्ट निर्णय दिलेला आहे आणि राज्य सरकारने त्यानुसार लवकरात लवकर कारवाई चे निर्देश द्यावे असे न्यायालयाने प्रतिपादीत केले. नागरिकांच्या अनुच्छेद २१ खालील जगण्याच्या अधिकारावर अशा भोंग्यांमुळे गदा येत असल्याचेही न्यायालय ह्यावेळी म्हणाले.