टीएमसी पासून सुरक्षेसाठी सुवेंदू अधिकारी हाय कोर्टात
 
पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदु अधिकारी ह्यांनी आपल्या प्रचारादरम्यान पोलिस संरक्षण मिळावे ह्यासाठी कलकत्ता हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
 

अधिकारी हे नुकतेच तृणमूल पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आले आहेत. ते तृणमूल पक्षाचे मोठे नेते होते. तृणमूल पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशाने मोठा धक्का बसला आहे.

 

तृणमूल चे नेते माझ्या प्रचारादरम्यान गोंधळ उडवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रवृत्त करत आहेत असे अधिकारींचे म्हणणे आहे. नुकताच त्यांच्या नंदीग्राम येथील कार्यालयावर तृणमूल च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे देखील भाजप चे म्हणणे आहे. भाजप च्या अनेक नेत्यांवर ह्यापूर्वी बंगाल मध्ये तृणमूल च्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला होऊ नये ह्यासाठी अधिकारीनी ही याचिका दाखल केल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!