RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने उस्मानाबाद शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना ( licence) रद्द केला आहे. ८ जानेवारीच्या आदेशानुसार ११ जानेवारी २०२१ पासून ह्या बँकेला कुठलेही बँकिंग व्यवहार करण्यास बंदी घातली गेली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच वसंतदादा बँकेची आर्थिक स्थिती बघता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत करण्यास असमर्थ आहे आणि म्हणून ठेवीदारांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी बँकेचा परवाना रद्द करणे गरजेचे आहे असे RBI कडून सांगण्यात आले आहे.
बँकेचा कारभार गुंडाळून दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होईल. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रियाही ह्यानंतर सुरू होईल. ठेवीदारांना जास्तीत जास्त ५ लाखांपर्यंतच्या ठेवींची रक्कम परत मिळू शकेल. ज्यांनी त्यापेक्षा जास्त पैसे बँकेकडे ठेव म्हणून दिले होते त्यांना ५ लाखांवरच्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे
RBI च्या ह्या कार्यवाहीमुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.