नवाब मलिक अडचणीत. एनसीबी कडून जावयाची चौकशी
 

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक अडचणीत आले आहेत. अवैध ड्रग्ज व्यापाराच्या प्रकरणात मलिक ह्यांचे जावई समीर खान NCB च्या रडार वर आहेत. NCB कडून समीर खान ह्यांना बुधवारी चौकशी साठी बोलावण्यात आले असून त्यांची NCB कार्यालयात चौकशी चालू आहे.

 

सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर NCB ने मुंबईत अवैध ड्रग्ज व्यापार करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. ह्यात बॉलिवूड मधील अनेक लोकांची नावे समोर येत आहेत.

ह्याच कारवाई दरम्यान NCB ला वांद्रे आणि चेंबूर इथल्या रेड मध्ये २०० किलो गांजा सापडला होता. त्यानंतर NCB ने करण सजनानी ह्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी करत असल्याचा संशय NCB ला होता. ह्या साजनानी च्या चौकशी दरम्यान समीर खान ह्यांचे नाव समोर आले. समीर खान ह्यांनी गूगल पे द्वारे साजणानी ह्याला २०,००० रुपये दिल्याचे उघड झाले. हा व्यवहार ड्रग्ज खरेदी विक्री चाच असल्याचा NCB ला संशय असल्याचे समजते.
 

समीर खान ह्यांच्या चौकशीतून काय बाहेर येते हे लवकरच कळेल. नवाब मलिक मात्र ह्या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!