टीआरपी विषयात कार्यवाही लवकरच – जावडेकर

टीआरपी विषयात सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल अभ्यासून ह्या विषयावर लवकरच कार्यवाही होईल असे संकेत सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी दिले.

 

टीआरपी म्हणजेच Television Rating Point हा वाहिन्यांची लोकप्रियता ठरवणारा निर्देशांक सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे टीआरपी च्या आकडमध्ये फेरफार करून काही वाहिन्यांना अधिक लोकप्रिय दाखवण्याचा घोटाळा झाला असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हंटले आहे. ह्या विषयात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही ह्या वाहिनिविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. BARC ही संस्था TRP मोजण्याचे काम करते. ह्या घोटाळ्यात BARC च्या माजी CEO वर देखील कारवाई झाली आहे.

 

ह्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाने ४ नोव्हेंबर २०२० रोजी एक समिती नेमली होती. वाहिन्यांची प्रेक्षक संख्या मोजण्याची सध्याची पद्धत पडताळून त्यात सुधारणा सुचवण्याचे काम ही समिती करणार होती. हे कामकाज पूर्ण झाले असून समितीने मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर केला आहे.

 

आता सरकार ह्या विषयात काय कार्यवाही करणार ह्याची सर्वांना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!