पुण्यात लागली लक्षवेधी पोस्टर्स.
'पोटगी बंद , कोर्ट मे चमत्कार', असे लिहिलेले पोस्टर पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ लागले आहे. Astrologer अतुल छाजेड असे लिहून पोस्टर वर संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.
विवाहित महिला, पुरुषांना विवाह कायद्यामुळे पोटगीचे अधिकार मिळाले आहेत. कायद्यात महिलेला पोटगीचा अधिकार असतो. पतीसोबत राहत नसताना घटस्फोट होईपर्यंत दर महिन्याला पोटगी देण्याविषयीचे आदेश कोर्ट देऊ शकते. हिंदू विवाह कायद्याने पुरुषांना देखील पोटगीचा अधिकार दिला आहे.
अशाप्रकारची पोटगी बंद करण्यासाठी कोर्टात चमत्काराचा दावा पोस्टरमधून केल्यासारखे प्रथमदर्शनी वाटते आहे.