कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांपैकी एक गट २६ जानेवारी ला दिल्लीत रिपब्लिक डे परेड दरम्यान ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याच्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अशा प्रकारच्या कुठल्याही रॅली, मोर्चा वा आंदोलनावर बंदी घालावी असा अर्ज दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. सोमवारी सुनावणी झालेल्या कृषी कायदा विषयक याचिकांमध्ये दिल्ली पोलिसांकडून हा अर्ज करण्यात आला आहे.
नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा अधिकार त्यातून मिळत नाही असे ह्या अर्जात म्हंटले आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे न्याय व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रजासत्ताक दिनी असे होणे देशासाठी लाजिरवाणे ठरेल असेही अर्जात म्हंटले आहे.
सोमवारी सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा हे प्रकरण कोर्टापुढे असणार आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर मंगळवारी कोर्ट काय प्रतिक्रिया देते, आंदोलकांचा ट्रॅक्टर रॅली चा प्लॅन कोर्ट हाणून पडणार का, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
One thought on “२६ जानेवारीला दिल्लीत कोणताही मोर्चा नको – दिल्ली पोलिस सुप्रीम कोर्टात”