नवाब मलिक ३ मार्च पर्यंत ईडीच्या कस्टडीत
 

महाराष्ट्राच्या महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक ह्यांना मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने १० दिवसांची पोलीस (ED) कस्टडी सुनावली आहे.

 

आज (२३ फेब्रुवारी ) रोजी नवाब मलिक ह्यांची ED कडून ८ तास चौकशी झाली व त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा कर्ता करविता कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर कडून कुर्ला येथील जमीन विकत घेतल्याप्रकरणी मनी लाँडरींग प्रतिबंधक कायद्याखाली मलिक यांच्याविरुद्ध ECIR म्हणजेच प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला.

 

अटक झाल्यानंतर मलिक ह्यांना मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या रिमांडवर सुनावणी झाली. मलिकांतर्फे अमित देसाई ह्यांनी युक्तिवाद केला तर ED तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह ह्यांनी युक्तिवाद केला. मालिकांनी ही जमीन वैधरित्या कॉन्ट्रॅक्ट करून हसीना पारकर कडून विकत घेतली असल्याचे देसाई ह्यांनी म्हंटले. ही जमीन सलीम पटेल मार्फत अवैध रित्या मलिक ह्यांनी बळकावली असे सिंह ह्यांनी कोर्टाला सांगितले. PMLA कायदा हा ह्या जमिनीच्या व्यवहारावेळी अस्तित्वात नसला तरी अवैधरित्या बळकावल्या ह्या जमिनीचा ताबा मलिकांकडे असल्याने हा गुन्हा अजूनही चालू आहे असे म्हणत सिंह ह्यांनी आपल्या आरोपांचे समर्थन केले.

 

अखेर दोन्ही बाजू ऐकून न्या. राहुल रोकडे ह्यांनी निर्णय जाहीर केला

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!