वकिलांसाठी उत्तरप्रदेशने केली अर्थसंकल्पात तरतूद

वकील कल्याणासाठी निधी राखून ठेवला असल्याची माहिती योगी आदित्यनाथांनी दिली

 

कोरोनाकाळात सर्वच न्यायालयीन सुनावणीवर बरेचसे प्रतिबंध असल्याने वकिली व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातही नव्याने या क्षेत्रात आलेले वकील, ज्युनिअर्स यांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात वकिलांसाठी तरतूद करणारे उत्तरप्रदेश हे जवळपास पहिले राज्य ठरले आहे.

   

उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. वकिलांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. राखून ठेवण्यात आलेला निधी वकिलांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!