वकिलांसाठी निर्धारित गणवेश ख्रिस्ती धर्माचे प्रतिक: अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका
 

भारतीय विधीज्ञ परिषद (Bar Council of India) च्या नियमांनुसार वकिलांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या गणवेशावर बंदी घालून नवीन गणवेश निर्धारित करावा ह्या मागणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ह्या याचिकेवर आज न्यायालयाने बार काऊन्सिल, केंद्र सरकार आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावत त्यांचे उत्तर मागितले आहे.

 

भारतात वकिलांसाठी काळा कोट आणि गळ्याभोवती बांधण्याचा बँड असा गणवेश बंधनकारक आहे. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याबरोबरच काळा झगा (गाऊन) परिधान करणे आवश्यक आहे. ह्या जनहित याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, हा गणवेश भारताच्या हवामानाला साजेसा नाही आणि भारताचे हवामान विचारात घेऊन निर्धारित केलेला नाही.

 

याचिकाकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की वकिलांना बंधनकारक असलेला बँड हे ख्रिस्ती धर्माचे प्रतिक आहे, त्यामुळे इतर धर्मीय वकिलांना हे ख्रिस्ती धर्माचे प्रतिक परिधान करण्याची सक्ती करता येऊ शकतं नाही. तसेच ह्या गणवेशात महिलांना पांढऱ्या रंगाची साडी किंवा सलवार कुर्ता घालण्याची सक्ती आहे पण हिंदू धर्माच्या प्रथांनुसार पांढऱ्या रंगाची वस्त्रे विधवा स्त्रिया परिधान करतात. बार काऊन्सिलने कोणताही विचार न करता हा गणवेश निर्धारित केला आहे.

 

वकिलांचा गणवेश निर्धारित करणारा बार काऊन्सिल नियामांमधील हा नियम भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत बसणारा नाही आणि त्यामुळे तो रद्द करून नवीन गणवेश निर्धारित करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी ह्या याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

One thought on “वकिलांसाठी निर्धारित गणवेश ख्रिस्ती धर्माचे प्रतिक: अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

  1. Yes, absolutely correct.. We wants new court dress, which suits to environment and which will give respect to Hindu dharma /religion.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!