मीडिया लॉ शिकण्याची सुवर्णसंधी; ‘ह्या’ कोर्स साठी प्रवेशाची उद्या अंतिम तारीख
 

मुंबईतील ॲड. बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयातर्फे एक आगळावेगळा आणि महत्त्वाचा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स इन मीडिया अँड कम्युनिकेशन लॉ असा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. ह्या कोर्स साठी नाव नोंदवण्याची अंतिम तारीख उद्या (१६ जुलै) रोजी आहे. ह्या अभ्यासक्रमाची ही दुसरी आवृत्ती असून पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

 

काय आहे ह्या अभ्यासक्रमात?

 

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात संपर्काची, दळणवळणाची अनेक माध्यमे वापरतो. दूरध्वनी पासून ते ईमेल पर्यंत अनेक माध्यमे खाजगी संवादासाठी वापरली जातात तर वर्तमानपत्रे, टिव्ही, फेसबूक सारखी समाज माध्यमे लोकांपर्यंत माहिती आणि विचार पोहोचवतात. ह्या सगळ्या माध्यमांविषयी भारतात असलेल्या वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास ह्या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना करायला मिळणार आहे.

राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा, वृत्तपत्रांसंबंधी कायदे, रेडिओ आणि टिव्ही संबंधी कायदे, दूरसंचार कायदे, समाज माध्यमांना आणि OTT प्लॅटफॉर्म ना लागू कायदे, सायबर गुन्हे, चित्रपटांना लागू असलेले कायदे तसेच ह्या सर्वांना लागू असलेल्या बौद्धिक संपदा कायद्याचा ह्या अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.
 

कालावधी

हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम दोन महिन्यांसाठी असणार आहे. यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

अंतिम तारीख

ह्या कोर्स साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १६ जुलै पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी

ह्या लिंक वर क्लिक करा

2 thoughts on “मीडिया लॉ शिकण्याची सुवर्णसंधी; ‘ह्या’ कोर्स साठी प्रवेशाची उद्या अंतिम तारीख

    1. नमस्कार. LawMarathi च्या पोस्ट वर कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद! कायदेविश्वातील सर्व घडामोडींच्या अपडेट्स साठी LawMarathi.com ला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!