लोकसभेत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज? वाचा
 

भारताच्या संसदेच्या दोन सदनांपैकी लोकसभा हे एक सदन. देशभरातून नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसभेत चर्चा करून कायदे पारित करतात. ह्या लोकसभेत Internship करण्याची सुवर्णसंधी तरुण विद्यार्थ्यांना आता उपलब्ध झाली आहे.

 

लोकसभेचे कामकाज कसे चालते, धोरणे कशी ठरतात, त्यासाठी कसे संशोधन करायचे ह्या सर्व गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा ह्यासाठी ही Internship खास सुरू करण्यात आली आहे.

 

ही इंटर्नशिप कोण करू शकतात?

 

१८ ते २५ ह्या वयोगटातील युवक ह्या Internship साठी अर्ज करू शकतात.

अर्जदाराने समाज शास्त्र, विधी, पत्रकारिता, भाषा, पर्यावरण, इ. पैकी विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असायला हवे.

 

Internship चा कालावधी?

 

किमान एक महिना ते कमाल ११ महिने एवढा कालावधी असेल

 

निवड झालेल्या interns ना प्रति महिना २५,००० रुपये मानधन दिले जाईल.

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख - २५ जून, २०२१

 

अर्ज कसा आणि कुठे पाठवायचा ह्या माहितीसाठी इथे क्लिक करा

   

2 thoughts on “लोकसभेत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज? वाचा

    1. ह्या पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अर्ज करू शकता.
      LawMarathi.com आपल्यापर्यंत विधी क्षेत्रातील विविध संधी आणि बातम्या पोहोचवत असते. अशाच संधींविषयी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करून सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!