नंदीग्रामच्या निकालाविरोधात ममता बॅनर्जींची कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका
 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करत नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला आव्हान दिले आहे.

 

ममता बॅनर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगाल राज्याची सत्ता टिकवली परंतु ममता ह्यांना आपल्या नंदीग्राम मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात असलेले परंतु नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले सुवेंदु अधिकारी ह्यांनी ममतांचा नंदीग्राम येथून पराभव केला होता.

 

ह्या याचिकेवर उद्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्या. कौशिक चंद ह्यांच्या पिठासामोर सुनावणी होणार आहे.

   

हे ही वाचा

बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात: दोन हजार महिला वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

 

‘नारदा टेप्स’प्रकरणी तृणमुलचे चार नेते अटकेत

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!