बंगाल हिंसा: १७ वर्षीय आणि ६४ वर्षीय बलात्कार पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात
 

पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि राज्यात प्रचंड हिंसाचार उसळला. अनेक नागरिकांनी इतर राज्यात स्थलांतर केल्याचेही समोर आले. हिंसाचाराचे अनेक हृदयद्रावक व्हिडिओ समाज मध्यामंवरून समोर आले. ह्यातच आता दोन बलात्कार पीडित महिलांच्या हेलावून टाकणाऱ्या कहाण्यांनी देशवासीयांना धक्का बसला आहे. ह्या दोन महिलांनी न्यायाच्या आशेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयात बंगाल हिंसाचाराची SIT/CBI कडून चौकशी व्हावी ह्यासाठी दाखल असलेल्या याचिकेत एका १७ वर्षीय मुलीने आणि एका ६४ वर्षीय महिलेने अर्ज दाखल केला आहे. भाजपचे कार्यकर्ते अविजित सरकार ह्यांचा तृणमूल कार्यकर्त्यांना निर्घृण खून केल्यानंतर त्यांच्या भावाने ह्या खुनाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ह्या दोन्ही महिलांनी आपल्यावर झालेल्या बलात्काराचा खटला बंगाल मध्ये न चालवता इतर राज्यात चालवावा ही मागणी केली आहे.

 

ह्यापैकी १७ वर्षीय मुलीने आपल्यावर तृणमूल काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले आहे. ९ मे च्या दिवशी ही मुलगी आपल्या मैत्रिणींबरोबर घरी परतत असताना ह्या ४ गुंडांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जंगलात टाकून दिले. दुसऱ्या दिवशी तृणमूल पक्षाच्या एस के बहादूर ह्या कार्यकर्त्याने तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना धमकावले. तृणमूल काँग्रेस पक्षाचा विरोध केल्यामुळे आपल्याला धडा शिकवण्यासाठी ह्या नराधमांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे ह्या मुलीने ह्या अर्जात म्हंटले आहे.

 

दुसऱ्या महिलेची कहाणी अशीच चीड आणणारी आहे. ह्या ६४ वर्षीय महिलेवर तिच्या ६ वर्षीय नातवासमोर सामूहिक बलात्कार केला गेला. खेजुरी येथून भाजप उमेदवार निवडून आल्याने तेथील स्थानिक तृणमूल गुंडांनी संतप्त होऊन ह्या महिलेच्या घरात शिरून तिच्यावर मारहाण केली, बलात्कार केला. कलकत्ता येथील अपोलो रुग्णालयात तपासणीनंतर बलात्कार झाला असल्याचे स्पष्ट होऊनही पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला उशीर केला.

 

राज्यातील पोलिस यंत्रणा सत्ताधारी पक्षाला अंकित असल्याने आपल्याला न्याय मिळत नसल्याचे ह्या बलात्कार पिडीतांचे म्हणणे आहे.

 

इतिहासात शत्रू राज्याच्या नागरिकांवर बलात्कार, हिंसा करण्याचे अनेक प्रसंग झाले. शत्रू सैन्याला खाच्ची करण्यासाठी, apmnait करण्यासाठी हे अमानुष अत्याचार केले जात. परंतु महिलांवर लोकशाही प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल, राजकीय विचारांमुळे असे भयंकर अत्याचार होत असल्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे, असे ह्या अर्जात म्हंटले आहे.

 

बंगाल हिंसाचाराच्या घटनाची स्वतंत्र चौकशी व्हावी ह्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्हीकडे अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत.

 

हे ही वाचा

 

बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात: दोन हजार महिला वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

 

बंगाल हिंसाचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

One thought on “बंगाल हिंसा: १७ वर्षीय आणि ६४ वर्षीय बलात्कार पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!