सोशल मीडिया Influencers साठी आजपासून ‘हे’ नवीन नियम लागू
 

आजपासून सोशल मीडिया वरील Influencers साठी नवीन नियम लागू झाले आहेत. आपल्या सोशल मीडिया account वरून जाहिराती केल्यास हे नवीन नियम लागू होतील. Advertising Standard Council of India (ASCI) चे हे नवीन नियम आहेत.

 

Influencers म्हणजे कोण?

 

सोशल मीडिया वर अनेक followers असलेल्या आणि ह्या followers वर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्ती म्हणजे Influencers. सध्या इंस्टाग्राम, यूट्यूब ह्या माध्यमांवर ट्रॅव्हल vlog, फॅशन, सौंदर्य, कॉमेडी अशा विविध विषयांवर व्हिडिओ करणारे अनेक influencers असतात. त्यांचे अनेक चाहते त्यांचे फोटो, व्हिडिओ बघतात, त्यांचे सल्ले ऐकतात.

 

अनेक वेगवेगळ्या वस्तू, सेवांचे उत्पादक, ब्रँड्स सद्ध्या आपल्या मार्केटिंग मधला बराच खर्च सोशल मीडिया मार्केटिंग वर करतात. त्यात अशा Influencers ना आपल्या उत्पादनाची जाहिरात करायला देण्यावरही बराच खर्च केला जातो. थेट करार करून किंवा मोफत उत्पादने देऊन, हॉटेल स्टे, ट्रीप अशा स्वरूपात मोबदला देऊन ह्या जाहिराती करवून घेतल्या जाऊ शकतात.

 

Influencers ना फॉलो करणाऱ्यांना बऱ्याच वेळा त्यांच्या व्हिडिओ/ फीड मध्ये जाहिरात केली असल्याचे समजत नाही. एखादा influencers एखाद्या उत्पादनाबाबत स्वतःहून बोलत आहे की जाहिरात म्हणून मोबदला घेऊन बोलत आहे हे ओळखणे अवघड होऊन जाते. ह्यामुळे followers ची फसवणूक होऊ शकते. Influencers चे ऐकून उत्पादने विकत घेणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी हे नवीन नियम करण्यात आले आहेत.

 

काय आहेत नियम?

 

आपल्या account वरून जाहिरात करत असल्यास ती जाहिरात असल्याचे उघड करणे आता Influencers ना बंधनकारक असणार आहे.

जाहिरात करायला देणारे म्हणजे उत्पादक आणि Influencers ह्यांच्यात ठोस संबंध असल्यास असे स्पष्टीकरण करणे आवश्यक असेल.

 

म्हणजे काय तर एखाद्या Influencer ला जर आपल्या व्हिडिओ/ फोटो द्वारे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी काहीही स्वरूपात मोबदला मिळत असेल तर त्याने ती जाहिरात असल्याचे उघड केले पाहिजे.

मोबदला हा रोख स्वरूपात नसेल आणि डिस्काउंट, free gift किँवा इतर काही स्वरूपात असेल तरी आपण जाहिरात करत आहोत हे त्या Influencer ला उघड करावे लागेल.

 

परंतु एखादा Influencer जर एखादे उत्पादन स्वतःहून वापरून त्याला ते आवडल्यास इतरांना त्याची शिफारस करत असेल आणि त्याचा आणि उत्पादन करणाऱ्यांचा काहीही संबंध नसेल तर त्याला हे स्पष्टीकरण द्यावे लागणार नाही कारण तो जाहिरात करत नाही.

 

कसे उघड करणार?

 

आपल्या फोटो/ व्हिडिओ वर लेबल लावून उघड करावे लागेल. हे लेबल Ad, Advertisement, Sponsored, Employee, Free Gift, Partnership, Collaboration ह्यापैकी असावे.

 

१५ सेकंदांपेक्षा कमी वेळचा व्हिडिओ असेल तर त्यावर तीन सेकंद हे लेबल दिसले पाहिजे.

१५ सेकंद ते दोन मिनिट ह्या मधला व्हिडिओ असेल तर त्यात एकूण वेळच्या १/३ वेळ लेबल दिसले पाहिजे.

२ मिनिट पेक्षा जास्त वेळाच व्हिडिओ असल्यास जेवढं वेळ त्या उत्पादनाविषयी काहीही बोलले / दाखवले जाईल तेवढा संपूर्ण वेळ लेबल दिसले पाहिजे.

 

हे लेबल ठळक आणि पटकन दिसेल असे असले पाहिजे. Hashtags मध्ये टाकून चालणार नाही.

लाईव्ह व्हिडिओ किंवा ऑडियो असल्यास त्यात सुरुवातीला आणि शेवटी ह्यात आपण जाहिरात करत आहोत हे स्पष्ट सांगावे लागेल.

 

Influencers नी हे नियम पाळावे ह्याची जबाबदारी जाहिरातदारांवर असेल.

 

आपण ज्याची जाहिरात करत आहोत ते उत्पादन खरोखर जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे आहे की नाही हे पडताळून घेण्याचा सल्ला Influencers ना देण्यात आला आहे.

 

नवीन ग्राहक संरक्षण कायद्याखाली लवकरच जाहिराती करणाऱ्या Influencers/ Celebrities साठी नवीन  नियम लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जर एखाद्या खराब, फसवणूक करणाऱ्या उत्पादनाची जाहिरात केली तर अशा सेलिब्रिटींना दंड होऊ शकणार आहे. त्याच धरतीवर ह्या नियमांमध्ये देखील Influencers ना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे नियम ग्राहकांच्या संरक्षणासाठी करण्यात आले आहेत. ग्राहकांना Influencers जाहिरात करत आहेत हे समजावे आणि त्यांनी एखादे उत्पादन विकत घेण्याचा निर्णय समजून उमजून करावा हा ह्या नियमांचा उद्देश आहे.

 

परंतु ASCI ही सरकारी यंत्रणा नसून एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ह्या नियमांना कायद्याचे स्थान नाही. परंतु ज्या संस्था, उत्पादक, जाहिरातदार ASCI चे सदस्य आहेत त्यांना हे नियम लागू आहेत. त्यामुळे ते जर Influencers तर्फे आपल्या उत्पादनांची जाहिरात करत असतील तर त्यावेळी हे नियम पाळावेच लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!