मुंबईत एका महिन्यात चार इमारती कोसळल्या, पालिका काय करतेय?: हाय कोर्ट
 

काल मालाड मालवणी मध्ये इमारत कोसळून ११ निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. ह्या दुर्घटनेची दखल घेत आज मुंबई उच्च न्यायालयाने अवैध, मोडकळीला आलेल्या बांधकामांच्या बाबतीत स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेतली. मागच्या वर्षी भिवंडीत इमारत कोसळून ४० व्यक्ती दगवल्यावर उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली होती.

 

न्यायालयाने मुंबई महापालिकेला ह्या सुनावणी दरम्यान चांगलेच फटकारले. मालवणी इमारत दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश आम्ही द्यावे का असे न्यायालयाने महाधिवक्ता कुंभकोणी ह्यांनी विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर  मालवणी येथील दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश कोर्टाने दिले. ह्या चौकशीचा प्राथमिक अहवाल २४ जून पर्यंत सादर करण्यात यावा असेही निर्देश दिले. तसेच ह्यासाठी अमायकस म्हणून ज्येष्ठ वकील शरत जगतियानी ह्यांची नेमणूक केली.

 

मालवणी दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांपैकी ८ लहान बालके आहेत. न्यायालयाने ह्यामुळे आपण अत्यंत व्यथित झालो आहोत असेही मत व्यक्त केले.

 

मुंबईत गेल्या एक महिन्यात उल्हासनगर मध्ये २ इमारती, वांद्र्यात एक तर मालाड मध्ये एक अशा इमारती कोसळल्या आणि त्यात अनेक निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. नागरिकांच्या जीवांची काहीच किंमत नाही का?, असा सवाल कोर्टाने पालिकेला केला.

 

प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील अनधिकृत बांधकामांची माहिती देणे अपेक्षित आहे. नगरसेवक फक्त निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी लोकांसमोर जाणार का?, असेही खडे बोल न्यायालयाने पालिकेला सुनावले.

 

दरम्यान ह्या दुर्घटनेची सर्व जबाबदारी न्यायालयावर ढकलणऱ्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कोर्टाने चांगलेच सुनावले. त्याबद्दल वाचा

 इमारती कोसळल्याचा दोष कोर्टावर ढकलू नका: हाय कोर्टाने पालिकेला सुनावले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!