कुलभूषण जाधव ह्यांना अपिलाचा अधिकार देणारा कायदा पाकिस्तानने केला पारित
 

भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव ह्यांना पाकिस्तानातील उच्च न्यायालयात अपील करता यावे ह्यासाठी पाकिस्तानी संसदेने कायदा पारित केला आहे. मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा परिणाम म्हणून पाकिस्तान सरकारला हा कायदा करणे भाग पडले.

 

जाधव ह्यांना २०१६ साली गुप्तहेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानी सैनिकी न्यायालयाने जाधव ह्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागत खटला लढवला होता. हरीश साळवे ह्यांनी भारताच्या बाजूने न्यायालयापुढे युक्तिवाद केला होता. त्यानंतर जाधव ह्यांना सुनावलेल्या शिक्षेचा योग्य पुनर्विचार व्हावा आणि भारताला त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची संधी मिळावी असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले होते.

 

ह्याच निर्देशांनुसार पाकिस्तानी राष्ट्रीय सभेने आंतरराष्ट्रीय न्यायालय ( पुनर्विलोकन व पुनर्विचार ) विधेयक २०२० पारित केले आहे. ह्यामुळे आता जाधव ह्यांना पाकिस्तानातील उच्च न्यायालयात अपील दाखल करता येणार आहे.

 

हा भारताचा मोठा राजनैतिक विजय आहे. परंतु जाधव ह्यांना अशा अपिलासाठी भारतीय किंवा त्रयस्थ देशातील वकिलाची नियुक्ती करता यावी अशी मागणी आता भारत सरकार करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!