संजय राऊत ह्यांनी आपला छळ केल्याचा दावा करणाऱ्या स्वप्ना पाटकर ह्यांना मुंबई पोलिसांनी केली अटक
 

शिवसेना खासदार संजय राऊत ह्यांनी आपला छळ केला असा दावा करणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर ह्यांना आज मुंबई पोलिसांनी कुठलाही समन्स, नोटीस न पाठवता अटक केली आहे अशी माहिती पाटकर ह्यांच्या वकील आभा सिंह ह्यांनी दिली.

 

बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावरील बाळकडू ह्या सिनेमाच्या पाटकर ह्या निर्मात्या आहेत. त्या संजय राऊत ह्यांच्या निकटवर्तीय होत्या. परंतु त्यांनी राऊत आपला गेली अनेक वर्षे प्रचंड छळ करत आहेत असे सांगणारे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना लिहिले होते. त्यानंतर पाटकर ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांच्याविरुद्ध याचिका देखील दाखल केली होती.

 

आज दुपारी वांद्रे पश्चिम येथील पोलिस निरीक्षक पद्माकर देवरे आणि इतर दोन पोलिस अधिकारी पाटकर ह्यांच्या घरी पोहचले आणि त्यांनी पाटकर ह्यांना पोलीस स्टेशनला नेले. पोलिसांनी आपल्याला कुठलाही समन्स, नोटीस किंवा FIR ची प्रत दिली नाही असे त्यांच्या वकील आभा सिंह ह्यांनी ट्विटर द्वारे सांगितले.

   

एका व्यक्तीने पाटकर ह्यांची PhD पदवी खोटी असल्याची तक्रार दाखल केल्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे अशीही माहिती सिंह ह्यांनी दिली. परंतु ही अटक म्हणजे पाटकर ह्यांना घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे सिंह ह्यांचे म्हणणे आहे.

   

काही दिवसांपूर्वी पाटकर ह्यांनी केलेली, आपल्यावर आरोप करणारी tweets काढून टाकावी ह्यासाठी राऊत ह्यांनी मुंबईतील कोर्टात अर्ज केला होता.

 

हे ही वाचा

 

स्वप्ना पाटकर ह्यांची अत्याचाराचे आरोप करणारी ट्विट्स काढून टाकावी: संजय राऊतांची कोर्टात धाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!