इंडियन मेडिकल अससोसिएशन चे प्रमुख जॉनरोज ऑस्टिन जयलाल ह्यांना दिल्लीतील कोर्टाने सज्जड डाँ देत IMA च्या व्यासपीठाचा वापर ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी करू नका असे बजावले आहे.
रोहित झा ह्या व्यक्तीने दिल्लीतील द्वारका अतिरिक्त जिल्हा न्यायालयात जयलाल ह्यांच्याविरुद्ध हिंदू धर्माविषयी मानहानीकारक वक्तव्ये केल्याबद्दल दावा दाखल केला आहे. ह्या दाव्यामध्ये आज एक अंतरिम आदेशात न्यायालयाने जयलाल ह्यांना बजावले.
जयलाल ह्यांनी ३० मार्च रोजी Christianity Today ह्या मासिकाच्या एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत आणि विविध वाहिन्यांवरील चर्चांमध्ये जयलाल ह्यांनी केलेली वक्तव्ये हिंदू धर्माचा अपमान करणारी होती असे झा ह्यांचे म्हणणे आहे. Allopathy च्या प्रसाराच्या नावाखाली जयलाल ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत आहेत आणि आयुर्वेद, हिंदू धर्माचा अवमान करत आहेत असेही झा ह्यांचे म्हणणे आहे.
कोरोना काळात रुग्णालयाचा उपयोग ख्रिस्ती धर्मप्रसारसाठी करण्याबद्दल जयलाल ह्यांनी वक्तव्य केले होते आणि येशू ख्रिस्तामुळे कोरोना चा प्रभाव कमी झाला असेही ते म्हणाले असा दावा झा हहांनी केला होता.
न्यायालयाने जयलाल ह्यांना IMA च्या अध्यक्षपदावर असताना जबाबदारीने बोलण्याचा सल्ला दिला. जयलाल ह्यांनी आपण अशी वक्तव्ये करणार नाही असे आश्वासन दिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक आदेश जारी केला नाही. परंतु त्यांना IMA च्या व्यासपीठावरून धर्माचा किंवा खाजगी मतांचा प्रसार करू नका असा सज्जड दम मात्र दिला आहे.