हा कोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न: एल्गार परिषद प्रकरणातील आरोपीच्या वकिलाने लिहिलेल्या लेखावरून कोर्ट संतापले
 

भीमा कोरेगाव हिंसाचारामागे  असलेल्या एल्गार परिषद प्रकरणातील अनेक आरोपींपैकी एक तथाकथित शहरी नक्षल हानी बाबू ह्याच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आरोग्याच्या कारणावरून जामीन मिळावा अशी आरोपीच्या पत्नीची मागणी होती.

 

न्या. शिंदे व न्या. आहुजा ह्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. आरोपीचे वकील युग चौधरी ह्यांना न्यायालयाने सुनावणीदरम्यान खडसावले. चौधरी ह्यांच्या सहकारी आणि एल्गार परिषद प्रकरणातील इतर काही आरोपींच्या वकील पायोशी रॉय ह्यांनी इंडियन एक्सप्रेस ह्या वृत्तपत्रात काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिला होता.

https://indianexpress.com/article/opinion/columns/elgaar-parishad-bombay-high-court-stan-swamy-bail-uapa-case-7331759/

 

ह्या लेखात त्यांनी तथाकथित शहरी नक्षल स्टॅन स्वामी ह्या भीमा कोरेगाव - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपीच्या जामीन न मिळण्यावर भाष्य केले होते.

 

“एकीकडे लेख लिहून न्यायव्यवस्थेबद्दल अविश्वास व्यक्त करणारे वकील आमच्यासमोर उभे राहून आम्हाला न्यायदानात सहायय कसे करणार?” असा सवाल कोर्टाने चौधरी ह्यांना केला. त्यावर हा लेख आपण लिहिला नसून आपण स्टॅन स्वामी चे वकील नसल्याचे चौधरी म्हणाले. परंतु लेख लिहीणार्या वकील रॉय ह्या चौधरी ह्यांच्या सहकारी असल्याचे आणि एकच घटनेतून निर्माण झालेल्या याचिकांमध्ये आरोपींच्या वकील असल्याचे कोर्टाने म्हंटले.

 

Sub Judice म्हणजेच न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांबद्दल असे लेख लिहिणे म्हणजे कोर्टावर दबाव टाकण्याचे तंत्र आहे असेही मत कोर्टाने व्यक्त केले.

 

कोर्टाने आरोपी बाबू ह्याला जामीन द्यायला नकार देत १५जून पर्यंत ब्रीच कँडी रुग्णालयातच ठेवण्याचा आदेश दिला.

 

ह्या लेखामुळे न्यायालय आपली मागणी फेटाळात असल्याचे दिसते असे मत वकील चौधरी ह्यांनी व्यक्त केले. त्यावर हा त्यांचा गैरसमज असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

   

हे ही वाचा

कोर्टावर दबाव आणू पाहणारी लॉबी…?

 

भीमा कोरेगाव हिंसा: गौतम नवलखाचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!