सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितला लसीकरणाचा संपूर्ण डेटा
 

सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनाबाबत घेतलेल्या सुओ मोटो याचिकेच्या ३१ मे रोजी झालेंक्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारला आदेश दिला आहे. आज कोर्टाच्या संकेतस्थळावर हा आदेश उपलब्ध झाला. न्या. चंद्रचूड, न्या. राव आणि न्या. भट ह्यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

 

काय आहे आदेश?

 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक सविस्तर प्रतिज्ञापत्र आपल्यापुढे दाखल करायला सांगितले आहे. ह्यात खाली माहिती देण्याचे आदेश केंद्राला कोर्टाने दिले आहेत,

 

१. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पात्र व्यक्तींपैकी किती टक्के व्यक्तींचे एक किंवा दोन्ही डोस घेऊन झाले  ह्याचा संपूर्ण तपशील

 

२. लसीच्या खरेदीविषयी संपूर्ण माहिती. Covaxin, Covishield, Sputnik ह्या लसीचे किती डोस कोणत्या तारखेला मागवले, ते कधी उपलब्ध होणार ह्याविषयी पूर्ण माहिती

 

३. उर्वरित लोकसंख्येचे लसीकरण कढीपर्यंत होईल ह्याविषयी माहिती

 

४. Mucormycosis साठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसाठी केंद्राने केलेल्या कार्यवाहीचा तपशील

 

ह्याच आदेशाद्वारे न्यायालयाने सर्व राज्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करून आपण आपल्या हद्दीतील नागरिकांना मोफत लस देणार का ह्याविषयी सोयष्टीकरण देण्याचे सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!