निवृत्ती नंतर केलेल्या लिखाणामुळे गुप्तहेर, सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे पेन्शन होऊ शकते रद्द

केंद्रीय नागरी सेवकांना लागू असलेल्या पेन्शन विषयीच्या नियमांमध्ये सुधारणा करत सरकारने एक नवीन नियम जारी केला आहे. ह्या नियमानुसार आता केंद्र सरकारच्या गुप्तहेर आणि सुरक्षा विभागांमधील अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर काही संवेदनशील लिखाण करून छापून आणण्यावर प्रतिबंध घातले गेले आहेत.

 

DoPT (डिपार्टमेंट ऑफ परसोनेल अँड ट्रेनिंग) ने केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियमांमधील नियम ८ मध्ये सुधारणा करत काही अधिकाऱ्यांवर हे प्रतिबंध घातले आहेत. रॉ, आयबी, ईडी, सिबीआय, एनसिबी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि माहिती अधिकार कायद्यातील दुसऱ्या परिशिष्टात समाविष्ट इतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांना हा नियम लागू असेल.

 

आशा अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर आपली संघटना, तिची कार्यपद्धती, इतर अधिकारी, संघटनेत असताना प्राप्त झालेली विशेष माहिती किंवा ज्ञान ह्याविषयी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही लेखन छापून आणता येणार नाही.

 

Civil servants

 

असे लिखाण त्या त्या विभागाच्या किंवा संस्थेच्या प्रमुखांच्या पूर्वपरवानगीने छापता येईल. परंतु पूर्वपरवानगी न घेता छापल्यास आशा अधिकाऱ्याचे निवृत्तिवेतन रद्द करण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकेल.

   

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!