देवेंद्र फडणवीस ह्यांची मानहानी केल्याच्या प्रकरणात आरोपींना समन्स
 

मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची मानहानी केल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना समन्स बजावले आहे.

 

सतीश उके आणि समीर शेख ह्या दोन व्यक्तींविरोधात फडणवीस ह्यांनी मानहानिची फौजदारी तक्रार दाखल केली होती. न्यायाधीश एन एन जोशी ह्यांनी ह्या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली. फडणवीस ह्यांचा जबाब १८ मे रोजी नोंदवण्यात आला.  प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य दिसून आल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींविरोधात समन्स बजावले आहे.

 

नागपूर मधील एक आर्किटेक्टच्या खुनात फडणवीस ह्यांचा संबंध असल्याचा आरोप करणारी एक प्रेस नोट उके आणि शेख ह्यांनी जारी केली होती. असे आरोप करणारी पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली होती. ही पत्रकार परिषद, प्रेस नोट मानहानीकारक असल्याने फडणवीस ह्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० खाली तक्रार दाखल केली. हे आरोप तथ्यहीन, खोटे असून ह्यामुळे नागरिकांची दिशाभूल झाली असल्याचे फडणवीस ह्यांनी म्हंटले आहे,

 

ह्या प्रकरणी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात अली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!