कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साथीच्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ह्यानंतर आता राज्य सरकारने इयत्ता ११ वी साठी प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय जारी केला आहे.
ही सामायिक प्रवेश परीक्षा राज्यभरातील १० वी मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. पण महत्त्वाचे म्हणजे ही सीईटी ऐच्छिक असणार आहे. जे विद्यार्थी सीईटी परीक्षा देऊ इच्छितात त्यांना ११ वी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर उर्वरित जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. १०० मरकांसाठी MCQ स्वरूपात ही परीक्षा होईल आणि परीक्षा देण्यासाठी २ तासाचा कालावधी असेल.
परीक्षा कधी घेण्यात येईल ह्याबद्दल अजून माहिती समजू शकलेली नाही.
इयत्ता दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत कशी असावी हे स्पष्ट करणारा एक शासन निर्णय देखील आज जारी करण्यात आला आहे. ह्यानुसर इयत्ता ९ वी चा अंतिम निकाल, १० वी च्या वर्षभरातील कामगिरीनुसार अंतर्गत गुण आणि १० वी च्या वर्षअखेरीस अंतर्गत तोंडी/ प्रात्यक्षिक चाचणीत मिळालेले गुण ह्या तीन घटकांद्वारे इयत्ता १० वी चे मूल्यांकन होईल. जे विद्यार्थी सीईटी देणार नाहीत त्यांचा ११ वी प्रवेश ह्या मूल्यांकनानुसार होईल. ह्या मूल्यांकनासाठीचा शासन निर्णय वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई उच्च न्यायालयात ह्यासंबंधी एक याचिका दाखल झालेली आहे. त्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला मूल्यांकन पद्धत आणि प्रवेश परिक्षेविषयीचा निर्णय ह्याबद्दल स्पष्टता मागितली होती. आता पुढील सुनावणीत शासनाच्या ह्या नवीन निर्णयावर न्यायालय काय म्हणते हे बघणे महत्वाचे आहे. अखेर १० वी परीक्षा आणि ११ वी प्रवेशाचे भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल असे आत्ता तरी दिसते आहे.
शासन निर्णय वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हे ही वाचा
दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून कोर्टाने राज्य सरकारला फटकारले
One thought on “११वी च्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय”