सुबोधकुमार जयस्वाल ह्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
 

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल ह्यांची सीबीआय च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

 

CBI

 

Central Investigation Bureau ह्या केंद्रीय तपास एजन्सी च्या संचालकपदी जयस्वाल ह्यांच्या नियुक्तीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि लोक सभेचे विरोधीपक्ष नेते अधीररंजन चौधरी ह्यांच्या समितीने घेतला आहे.  समितीच्या ९० मिनिटे चाललेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

 

फेब्रुवारी महिन्यात ऋषिकुमार शुक्ला ह्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यापासून हे पद रिक्त होते. आता जयस्वाल ह्यांची पुढील २ वर्षांसाठी ह्या पदावर नियुक्ती झाली आहे.

 

२०१९ मध्ये महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झालेले जयस्वाल हे नंतर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर CISF चे संचालक झाले होते. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून त्यांचे महविकास आघाडी सरकारशी मतभेद झाल्याचे वृत्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!