बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात: दोन हजार महिला वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर हिंसाचार उसळला. ह्या हिंसाचारात निष्पाप नागरिकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली झाली. ह्याच विषयाकडे देशाच्या सरन्यायाधीशांचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील २००० हून अधिक महिला वकिलांनी त्यांना विनंती करणारी एक याचिका पाठवली आहे

 

ह्या याचिकेत असे म्हंटले आहे की, बंगालमध्ये कायद्याचे राज्य आणि लोकशाही ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून इतर राजकीय कार्यकर्ते आणि जनतेवर अनन्वित अत्याचार होत आहेत आणि पोलिसांकडून किंवा राज्य सरकारकडून पीडितांना कुठलेही संरक्षण मिळत नसल्याचे दिसते आहे. उलट तक्रार करणाऱ्यांना धमकावले जात आहे, त्यांच्या वकिलांना धमक्या मिळत आहेत. अनेकांनी आजूबाजूच्या राज्यात पलायन केले आहे.

 

ह्या प्रचंड हिंसाचार आणि अत्याचाराची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने स्वतंत्र SIT नेमावी, पोलिसांना तक्रारी दाखल करून घेण्याचे निर्देश द्यावे आणि न्याय करावा अशी मागणी ह्या सर्व महिला वकिलांनी केली आहे. आजूबाजूच्या राज्यात आश्रय घेतलेल्या बंगाली जनतेला राज्यात पुन्हा येण्यासाठी संपूर्ण संरक्षण मिळावे अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच सरन्यायाधीशांनी आपल्या घटनादत्त अधिकारांचा वापर करत पश्चिम बंगाल राज्यात संवैधानिक यंत्रणा ढासळली असल्याचे घोषित करावे अशी मागणी ह्या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

   

हे ही वाचा

बंगाल हिंसाचारातील पीडित निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

   

बंगाल हिंसाचार: कलकत्ता उच्च न्यायालयाने मागितला अहवाल

   

बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

   

हे ही बघा

 

2 thoughts on “बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात: दोन हजार महिला वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!