काँग्रेस टूलकिट संबंधी ट्विट्स वर फेरफार केल्याचा शिक्का मारल्याबद्दल ट्विटरला नोटीस

ट्विटर ह्या समाज माध्यम चालवणाऱ्या कंपनीला दिल्ली पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. ट्विटरला काँग्रेस टूलकिट प्रकरणाची काय माहिती आहे हे विचारणारी ही नोटीस आहे.

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे एक टूलकिट समाज माध्यमांवर सर्वत्र खळबळ माजवत होते. पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यासाठी काय काय उपाय करावेत हे काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगणारे ते टूलकिट काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाने तयार केले असल्याचा दावा होता. ह्या टूलकिट मध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन रूपाला भारतीय स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन म्हणा असेही लिहिले होते. ह्या टूलकिट बद्दल भाजप प्रवक्ते संबित पात्रा, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्यांनी ट्विटर वर tweets केली होती.

 

ट्विटर ने ह्या tweets वर ‘Manipulated Media’ असा टॅग लावला होता. एखादा फोटो, व्हिडिओ अथवा इतर मजकूर फेरफार, छेडछाड केलेला असेल असे ट्विटरला वाटले तर ट्विटर त्यावर असा टॅग लावते.

 

ह्याच टॅग वरुन दिल्ली पोलिसांनी ट्विटरला नोटीस पाठवली आहे.

ट्विटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक मनीष महेश्वरी ह्यांना ही नोटीस काढण्यात आली आहे. काँग्रेसचे हे टूलकिट खोटे किंवा फेरफार केलेले असल्याचा ट्विटर कडे काय पुरावा आहे? कोणत्या पुराव्यांच्या आधारे ट्विटर ने टूलकिट संबंधित tweets वर खोटी माहिती असल्याचा शिक्का लावला? असे प्रश्न दिल्ली पोलिसांकडून ट्विटरला विचारण्यात आले आहेत. काँग्रेस टूलकिटची आपण चौकशी करत असल्याने ट्विटर कडे त्याबद्दल पुरावे असल्यास आपल्या चौकशीला त्याचा उपयोग होईल अशी दिल्ली पोलिसांची भूमिका आहे.

 

केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दात ताकीद देत ह्या tweets वरील Manipulated Media हा टॅग काढण्याचे निर्देश दिले होते.

 

काँग्रेस पक्षाकडून टूलकिट संबंधी सर्व आरोप फेटाळले गेले असून छत्तीसगड राज्यात त्यांनी भाजप नेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

हे ही वाचा

काँग्रेस पक्षाच्या टूलकिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!