केईममध्ये पाच कोटींचा घोटाळा: पाच महिन्यांनी पोलीस तक्रार
 

भोईवाडा पोलिसांनी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलच्या एका सहायक लेखापालास नुकतीच अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. साधारणतः ५.२३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समजते. हा घोटाळा अनेक दिवसांपूर्वी निदर्शनास आला होता. मात्र आरोपी पैसे परत आणून देतील या आशेवर हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलीस तक्रार करण्यात आली नव्हती. हॉस्पिटलच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका ट्रस्टसंबंधित हा घोटाळा असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणाशी महापालिका अथवा हॉस्पिटलचा थेट संबंध नाही, असा खुलासा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

   

आरोपींनी धनादेशावर खोट्या सह्या करून विविध खात्यांवर साधारणतः पाच कोटी परस्पर वळवले. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गेले अकरा वर्षे आरोपी अशाप्रकारे पैसे वळवत होते. अटकेत असलेल्या सहायक लेखापालाचे नाव राजन राऊळ असल्याचे समजते. तर त्याचा साथीदार असलेला मुख्य आरोपी श्रीपाद देसाई अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

   

ट्रस्टच्या सेक्रेटरी संध्या कामत यांना एका धनादेशावरून संशय आला. त्यानंतर त्यांनी प्राथमिक फॉरेन्सिक ऑडिट केले. ऑडिटमध्ये देसाई-राऊळ दोषी आढळले. प्रशासनाने दोघांनाही सेवेतून काढून टाकले होते. परंतु आम्ही पैसे परत करतो, असे आश्वासन दोघांनी दिलेले असल्यामुळे पोलीसात तक्रार देण्यात आली नाही.

   

अखेर पाच महिने वाट पाहिल्यावर केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी FIR दाखल केली असून त्या अनुषंगाने भोईवाडा पोलीस कारवाई करीत आहेत.

   

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!