कुस्तीपटू सुशील कुमार ह्याला खुनाच्या आरोपावरून सहा दिवसांची पोलीस कोठडी
 

४ मे रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम मध्ये सागर नावाच्या एका प्रशिक्षणार्थी कुस्तीपटूचा खून झाला. हा खून केल्याच्या आरोपावरून भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा एक साथीदार अजय कुमार ह्यांना दिल्ली पोलिसांनी आज अटक केली होती. त्यांना आज दिल्लीतील मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले.

 

कोर्टाने ह्या दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने १२ दिवसांच्या पोलिस रिमांडची मागणी करण्यात आली होती परंतु कोर्टाने ६ दिवसांची पोलीस रिमांड दिली आहे.

 

सागर ह्याचा मृत्यू दंडुक्याचा मार लागल्याने झाल्याचे पोस्ट मोर्टेम अहवालातून समोर आले होते. हे हत्यार पोलिसांना तपासात मिळाले.

 

सुशील कुमारने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दिल्लीतील कोर्टात अर्ज केला होता परंतु त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढला होता. सुशील कुमार सदर घटनेनंतर फरार होता. परंतु अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.

 

आता पुढील ६ दिवस सुशील कुमार आणि त्याच्या  साथीदाराला पोलिस कोठडीत काढावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!