बंगाल हिंसाचारातील पीडित निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
 

पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पीडित नागरिक निर्वासित झाले असल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

 

आज न्या विनीत सरन ह्यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील पिंकी आनंद ह्यांनी ह्या याचिकेची लवकरात लवकर सुनावणी व्हावी ह्यासाठी mentioning केले. ही याचिका कोर्ट पुढील आठवड्यात ऐकणार आहे.

 

पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक निकालानंतर विजेत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात अनेक बळी गेले आहेत, विरोधी राजकीय विचारांच्या महिलांना लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागले आहे. तसेच अनेक नागरिकांना आपली घरे सोडून निर्वासित व्हावे लागले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

सरकार पुरस्कृत हिंसाचारामुळे पीडितांच्या मानवाधिकार, जगण्याच्या अधिकारावर गदा आली आहे आणि पोलिसांकडून त्यांना कोणतेही संरक्षण मिळत नाहिये असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

हिंसाचारात पीडित निर्वासितांना तातडीने संरक्षण, राहण्याची पर्यायी व्यवस्था आणि अन्न, आरोग्य सुविधा  पुरवण्यात याव्या ही मागणी ह्या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

केंद्र सरकारला कोर्टाने बंगाल मधील अंतर्गत हिंसा थांबवण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ३५५ खालील अधिकारांचा वापर करण्याचे निर्देश द्यावे, बंगाल मध्ये केंद्रीय सुरक्षा दले पाठवावीत, एका स्वतंत्र SIT द्वारे ह्या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी अशा मागण्याही ह्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

 

हे ही वाचा

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारला नोटीस

 

बंगाल हिंसाचार: कलकत्ता उच्च न्यायालयाने मागितला अहवाल

 

बंगाल हिंसाचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

One thought on “बंगाल हिंसाचारातील पीडित निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!