काँग्रेस पक्षाच्या टूलकिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
 

काल सोशल मीडिया वर उघडकीला आलेल्या काँग्रेस पक्षाच्या तथाकथित टूलकिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

 

काय आहे हे टूलकिट?

समाज माध्यमांवर एक दस्तावेज समोर आले आहे. ते काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाने अंतर्गत वापरासाठी satay kele असल्याचे दिसते आहे. ह्यात कोरोना महमारीचा पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी कसा उपयोग करायचा ह्याविषयी काही कल्पना आणि सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या नवीन mutant ला ‘Indian Strain’ म्हणा असेही त्यात लिहिले आहे. ह्यावरून काँग्रेस वर प्रचंड टीका होताना दिसते आहे.  पक्षाच्या फायद्यासाठी कोरोनाच्या नवीन रूपाला भारतीय म्हणणे म्हणजे देशाची बदनामी करणे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.

ह्या टूलकिट मध्ये कुंभ मेळ्याला सुपर स्प्रेडर म्हणा असेही लिहिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि काँग्रेस जवळची माध्यमे ह्यांचा वापर करून मोदींनी कोरोना महामारी नीट हाताळली नाही असा प्रचार करा असेही त्यात लिहिले असल्याचे आरोप आहेत.

 

काँग्रेस पक्षाने हे टूलकिट खोटे असल्याचा दावा करत आपला ह्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर नेटिझन्सनी हे टूलकिट काँग्रेस पक्षाच्याच सोम्या वर्मा ह्यांनी तयार केले असल्याचे शोधून काढले होते.

याचिका कशासाठी?

शशांक शेखर झा ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने ह्या टूलकिट ची चौकशी करून त्यातून देशद्रोह, गुन्हेगारी कट किंवा समाजात अशांतता पसरवण्याचा गुन्हा झाला आहे का हे तपासावे आणि कार्यवाही करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस पक्षाने टूलकिट नुसार असे देशद्रोही कृत्य केले असेल आणि सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे कृत्य केले असेल तर निवडणूक आयोगाने ह्या पक्षाची नोंदणी रद्द करावी असा आदेश कोर्टाने द्यावा अशीही मागणी ह्या याचिकेत करण्यात आली आहे.

 

काँग्रेस पक्षाने टूलकिट संबंधी सर्व आरोप फेटाळले आहेत.

 

One thought on “काँग्रेस पक्षाच्या टूलकिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!