भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारला नोटीस
 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी २ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे.

 

अविजीत सरकार ह्या मृत कार्यकर्त्यांचे बंधू आणि हरण अधिकारी ह्या मृत कार्यकर्त्यांच्या पत्नी ह्यांनी ह्या हत्यांची सीबीआय चौकशी व्हावी किंवा न्यायालयाने नेमलेल्या SIT कडून चौकशी व्हावी ह्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. ह्या दोन्ही कार्यकर्त्यांची हत्या ममता बॅनर्जी ह्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वकेली असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

ह्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. विनीत सरन आणि न्या. भूषण गवई ह्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

 

न्यायालयाने ह्या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच केंद्र सरकार व राष्ट्रीय मानव हक्क आयोगालाही आपली बाजू मांडायला सांगितली आहे. पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

 

याचिकाकर्त्यांचे वकील महेश जेठमलानी ह्यांनी हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या पार्थिव शरीरावर पोस्ट मोर्टेम झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत व पोस्ट मोर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावे अशी मागणी केली आहे.

 

बंगाल हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

 

बंगाल हिंसाचार: कलकत्ता उच्च न्यायालयाने मागितला अहवाल

 

‘नारदा टेप्स’प्रकरणी तृणमुलचे चार नेते अटकेत

बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

 

हे ही बघा

 

One thought on “भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारला नोटीस

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!