परमवीर सिंह ह्यांच्या याचिकेच्या सुनावणीतून न्या. गवई ह्यांची माघार
 

सर्वोच्च न्यायालयात आज मुंबईचे माझी आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीतून न्या. गवई ह्यांनी माघार घेतली आहे.

 

परमवीर सिंह ह्यांनी महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या विभागीय चौकशीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर आज न्या. विनीत सरन आणि न्या. भूषण गवई ह्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.

 

सुनावणी सुरू होताच न्या. गवई ह्यांनी आपण ह्या याचिकेच्या सुनावणीतून स्वतःला बाद करत असल्याचे सांगितले. न्या. गवई ह्यांचे मुंबई उच्च न्यायालय हे पालक न्यायालय असून ते महाराष्ट्राचे असल्याने त्यांनी महाराष्ट्र सरकारविरुद्ध आणि मुंबई उच्च न्यायालयास निगडित ह्या प्रकरणातून स्वतःला बाद करून माघार घेतली असावी असा अंदाज आहे.

 

न्यायाधिशांना अशी माघार घेता येते. त्याला Recusal असे म्हणतात. जर एखाद्या प्रकरणाशी न्यायाधीशांचा काही वैयक्तिक संबंध असेल किंवा आपण ते प्रकरण तटस्थपणे हाताळू शकणार नाही असे वाटल्यास न्यायाधीश असे recusal करु शकतात.

 

सिंह ह्यांची याचिका आता दुसऱ्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवली जाईल.

 

ही याचिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे वाचा,

आपल्याला मिळणाऱ्या धमक्यांची सीबीआयने चौकशी करावी ह्यासाठी परमवीर सिंह सर्वोच्च न्यायालयात

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!