तृणमूल नेत्यांच्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयाकडून स्थगिती
 

नारदा टेप्स प्रकरणातील आरोपी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आज सीबीआयने अटक केल्यानंतर लगेच विशेष सीबीआय कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. परंतु कलकत्ता उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेऊन ह्या जामिनीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे किमान आजची रात्र तरी ह्या तृणमूल नेत्यांना कोठडीत काढावी लागणार आहे.

 

ह्या आरोपींमध्ये तृणमूल पक्षाचे पश्चिम बंगाल मधील २ कॅबिनेट मंत्री बॉबी हकीम, सुब्रता मुखर्जी, एक आमदार मदन मित्रा आणि कलकत्त्याच्या माजी महापौर सोवन चॅटर्जी ह्यांचा समावेश आहे.

 

नारदा प्रकरण काय आहे आणि सीबीआय कडून ह्या नेत्यांना अटक का झाली हे जाणून घेण्यासाठी आमचा हा रिपोर्ट वाचा,

‘नारदा टेप्स’प्रकरणी तृणमुलचे चार नेते अटकेत

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!