मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणीची पूर्वतयारी करण्यासाठी उद्या दिल्लीत वकिलांबरोबर होणार बैठक.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे गेले असल्याचे समजते. यापूर्वीच्या सुनावणीत राज्य शासनातील समन्वयाच्या अभावाचा विपरीत परिणाम मराठा आरक्षण केस वर झाला होता असे तज्ज्ञांनी म्हटले होते.
तशी नाचक्की पुन्हा नको, म्हणून अशोक चव्हाण दिल्लीकडे रवाना झाले आहेत का, हा प्रश्न आहे.