फेब्रुवारी २०२० मध्ये राजधानी दिल्लीत उसळलेल्या धार्मिक दंगलीतील एक आरोपी गुलफाम ह्याला ईद साजरी करण्यासाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
दिल्लीतील न्यायालयात गुलफाम ह्याने ईद निमित्त आपल्याला अंतरिम जामीन देण्यात यावा असा अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला १५ दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.
“मुस्लिम समाजासाठी ईद हा आनंदाचा सण आहे. ईद हा इस्लाम साठी महत्त्वाचा काळ आहे, ज्यात कुटुंब , आप्तेष्ट आणि समाज एकत्र येऊन आनंद साजरा करतात.” असे म्हणत अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव ह्यांनी हा जामीन मंजूर केला.
गुलफाम याच्याविरुद्ध दिल्ली दंगलीत सहभगवारून ८ गुन्हे दाखल आहेत. ह्यापैकी सादर गुन्हा हा दयालपुर पोलिस स्टेशन इथे दाखल करण्यात आला होता. दंगल सुरू असताना एका जमावाने केलेल्या गोळीबारात अजय गोस्वामी नावाच्या व्यक्तीला गोळी लागून तो जबर जखमी झाला होता. ह्या प्रकरणात गुलफाम वर भारतीय दंड संहिता आणि Arms Act अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आपल्यावर दाखल इतर गुन्ह्यांमध्ये आपल्याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला असल्याचे आरोपीकडून कोर्टाला सांगण्यात आले. त्या धरतीवर ह्या गुन्ह्यात देखील ईद साजरी करण्यापुरता अंतरिम जमीन मिळाव अशी मागणी कोर्टाला करण्यात आली.
२०,००० रुपयांच्या बाँड वर आरोपीला १५ दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला असून त्याला परवानगी शिवाय शहर सोडून न जाण्याची अट घालण्यात आली आहे.
ऑर्डर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
संबंधित रिपोर्ट
२०२० दिल्ली दंगल: दोन आरोपींचा जामीन फेटाळला