परमवीर सिंह ह्यांना तूर्तास अटक नाही: सरकारचे कोर्टात आश्वासन

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांना ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तूर्तास तरी अटक होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले.

 

परमवीर सिंह यांच्याविरुद्ध पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे ह्यांनी अकोला येथे ॲट्रॉसिटीच्या कायद्याखाली तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून ठाणे येथे FIR दाखल करण्यात आला होता.

 

हा FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका परमवीर सिंह ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी झाली.

 

सिंह ह्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी ह्यांनी हा FIR म्हणजे पोलिसांच्या अधिकाराचा गैरवापर असल्याचे म्हंटले.

 

राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील दरायास खंबाटा ह्यांनी आपला रिप्लाय दाखल करण्यास वेळ मागून घेतला.

तोपर्यंत सिंह ह्यांना अंतरिम संरक्षण मिळावे अशी मागणी जेठमलानी ह्यांनी केली. त्यावर आपण रिप्लाय दाखल करेपर्यंत सिंह ह्यांना अटक करणार नाही असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

 

पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत परमवीर सिंह ह्यांना अटक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

हे ही वाचा

परमवीर सिंह ह्यांची राज्य सरकारविरुद्ध नवीन याचिका

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!