पुणे मनपाची कोर्टात नाचक्की: वाचा काय झाले
 

कोरोना व्यवस्थापनासंबंधी याचिकेवर सुनावणी सुरू असताना आज मुंबई उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिकेची चांगलीच नाचक्की झाली.

 

याचिकाकर्त्यांनी पुण्यात बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावेळी पुणे मनपाच्या वकिलांनी ह्या क्षणी ५  व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना पालिकेच्या हेल्पलाईन नंबर वर फोन करायला सांगितला व फोन लाऊडस्पीकर वर ठेवायला सांगितला.

 

याचिकाकर्त्यांचे वकील इनामदार ह्यांनी फोन लावल्यावर एकही बेड उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले.

 

पालिकेचे वकील कुलकर्णी ह्यावर म्हणाले, की अशाप्रकारे खरेखोटे करण्यासाठी केलेल्या फोन वर माहिती देण्यात येत नाही. रुग्णाचा संपूर्ण तपशील सांगितल्याशिवाय माहिती दिली जात नाही.

 

“फोन वर रुग्णाच्या तपशिलाचा विचारणा झालीच नाही. रुग्ण किंवा नातेवाईक त्रस्त असताना फोन करतात, त्यांना पालिकेच्या हेल्पलाईन वरील अधिकाऱ्याकडून तपशील विचारला जायला हवा पण तसे होताना दिसत नाही” असे निरीक्षण न्या. कुलकर्णी ह्यांनी नोंदवले.

 

याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की पालिकेच्या dashboard वर अचूक ताजी माहिती उपलब्ध नाही.

 

न्यायालयाने IMA चे वकील देशपांडे ह्यांना डॉक्टर्स मार्फत पुन्हा फोन करून विचारायला सांगितले. परंतु पुन्हा बेड उपलब्ध नसल्याचेच उत्तर मिळाले.

 

ह्यानंतर न्यायालयाने पुणे मनपाला परिस्थिती संवेदनशीलपणे हाताळण्याच्या सूचना दिल्या. पालिकेच्या वकिलांनी कंट्रोल रूम कडे ताजी माहिती असेल ह्याची तजवीज करण्याचे आश्वासन कोर्टाला दिले.

 

कोर्टात घडलेल्या ह्या प्रकारामुळे पालिकेच्या कोरोना विषयक व्यवस्थापनातील त्रुटी उघडकीस आल्या. पालिका ह्यात लवकरच सुधारणा करेल अशी आशा पूनेकरणकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!