मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांसाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या प्रांगणात विशेष लसीकरण मोहीम आयोजित केली जाणार असल्याचे समजते आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता ह्यांच्या पुढाकारातून आणि बृहन्मुंंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून अशी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
१००० वकिलांना उच्च न्यायालयाच्या प्रांगणात लस दिली जाणार आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल ह्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे.
केवळ CoWin ॲप वर रजिस्टर केलेल्यांनाच ह्या लसीकरणाचा लाभ घेता येईल तसेच ह्यात केवळ Covishield लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ह्या मोहिमेसाठी मुंबई उच्च न्यायालयातील बार असोसिएशन्स वकिलांची माहिती गोळा करत आहेत. त्यासाठी एका गूगल फॉर्म ची लिंक जाहीर करण्यात आली आहे. त्या लिंक वरील फॉर्म भरून इच्छुक वकिलांनी आपली माहिती द्यायची आहे.
सदर फॉर्म नुसार, खालील ४ वकील संघटनांचे सदस्य ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतील असे दिसते आहे,
Bombay Bar Association,
Advocates Association of Western India
Bombay Incorporated Law Society
Interactive Session of Women Advocates
ह्यापैकी कोणत्याही संघटनेचे सदस्य नसलेल्या परंतु उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांना ह्या मोहिमेत सहभागी होता येणार की नाही ह्यावर स्पष्टता झालेली नाही.
६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वकिलांच्या पती/पत्नी ह्यांनाही ह्या मोहिमेचा लाभ घेता येणार आहे.
अशीच मोहीम कनिष्ठ न्यायालयाच्या वकिलांसाठीही आयोजित करण्याचा विचार असल्याचे समजते. परंतु सध्यातरी ही लसीकरण मोहिम केवळ मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांसाठीच आयोजित होणार आहे.