कर्नाटक बार कौन्सिल कडून कोरोना झालेल्या वकिलांना आर्थिक मदतीची घोषणा

कर्नाटक राज्य बार कौन्सिल च्या ७ मे रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. KSBC आपल्या कोरोनाग्रस्त सदस्यांना आर्थिक मदत पुरवणार आहे.

 

कोरोना झालेल्या सदस्य वकिलांना Home Quarantine असल्यास १०,००० रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असल्यास २५,००० रुपये मदत देण्याचा निर्णय कर्नाटक बार कौन्सिल ने जाहीर केला आहे.

 

Karnataka state bar council resolution

   

तसेच KSBC तर्फे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय ओक ह्यांच्याकडे एक मागणी करण्यात आली होती. प्रत्येक तालुका, जिल्हा स्तरावर वकील आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला द्यावे अशी ही मागणी होती. KSBC ने पाठपुरावा केल्याने कर्नाटक सरकारने ही मागणी मान्य करून अशा अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती बार कौन्सिलच्या वतीने देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल ने ही अशा स्वरूपाची मदत आपल्या सदस्य वकिलांना करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!